आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कोरोनावर मात करत आपल्याला घराचा गाडा चालता रहावा म्हणून एक पैसे कमवून देणारा सोर्स असणे आवश्यक आहे. मग ती नोकरी असो की व्यवसाय. कोरोना संकटाच्या काळात लॉकडाऊन संपताच नोकरी मिळणे कठीण आहे. ज्यांच्याकडे नोकरी आहे ते लॉकडाऊन जारी केल्यानंतर घरी असल्यामुळे त्यांना त्यांच्या नोकरीची शाश्वती नाही. अशातच आता अनेक फ्रेशर नोकरीसाठी बाहेर पडतील. 

नोकरीची गरज असल्यामुळे मिळेल ती नोकरी स्वीकारण्यासाठी लोक तयार असणार; पण यामध्ये फसवणूक होऊ शकते. कारण आपल्याला नोकरीची गरज असली की, आपण मागे-पुढे न पाहता आलेली संधी स्वीकारून मोकळे होतो. मात्र आपल्याला खरंच नोकरी मिळणार आहे का? आपली फसवणूक तर होत नाही ना? याचा आपण कोणताही अंदाज  न घेता नोकरी स्वीकारतो. अनेक खोट्या आणि फसव्या संधीपासून सावध कसे राहायचे, आज याची माहिती वंटास मुंबई देण्याचा प्रयत्न करत आहे. 

या गोष्टींपासून सावध राहणे गरजेचे...

● अनेकदा कोणतीही परीक्षा न घेता नोकरीची ऑफर दिली जाते. यापासून विशेष सावधान राहिले पाहिजे. कारण कोणतीही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची काबिलीयत पाहूनच नोकरी देते. यावर कंपनीचा फायदा दडलेला असतो. त्यामुळे तुम्हाला कोणी शिक्षण न बघता थेट इंटरव्ह्यूला बोलतवत असेल तर सावध.

● नोकरी मिळविण्यासाठी तुम्हाला काही रक्कम भरण्यासाठी सांगितली जाते आणि पहिला पगार आल्यानंतर ती रक्कम रिफंड होईल, असे सांगितले जाते. यापासून सावध राहा. आपण नोकरी पैसे कमविण्यासाठी करत असतो. जर पैसे देऊन नोकरी लागत असेल तर तोटा तुमचाच असणार. 

● बहुदा मुलाखत न घेता ऑफर लेटर किंवा पैसे भरायला लावणे या शंकास्पद गोष्टी आहेत. या ओळखून आपण यापासून सावध राहिले पाहिजे. 

● खात्री पटल्याशिवाय तुमची कॉम्फिडेन्शल माहिती जसे, बँकेचे डिटेल्स, क्रेडिटकार्ड, OTP, आधार, पॅन कार्ड यांसंबधीत माहिती देऊ नये. बनावट कंपन्या या गोष्टी आपल्याकडे मागू शकतात. कारण नोकरी देणारी कंपनी थेट अशा गोष्टींची मागणी करत नाही.

● आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त पगार ऑफर करण्यात आला तर त्या नोकरीला भांबावून जाऊ नये. पूर्णतः कंपनीचा अभ्यास करून योग्य तो निर्णय घ्यावा. 

● ऑनलाईन पोर्टलवरून नोकरीसाठी अर्ज करताना पोर्टलची खात्री करून घेणे आवश्यक असते.  बऱ्याचदा त्या पोर्टलचे नावही चुकीचे किंवा फसवे असू शकते. आता हे ओळखण्यासाठी एक उपाय असा की फसव्या जाहिरातींचे लिखाण करताना काही चुका (व्याकरण) असतात. ज्या पाहिल्या गेल्या पाहिजे. 
 
आपली फसवणूक होऊ नये म्हणून ही काळजी घ्या...

● मोबाईल अथवा कोणत्याही ऑनलाईन प्रक्रियेतून नोकरी निश्चित करू नका. 

● स्वतः जबाबदार नागरिक बनून संबंधित कंपनीला भेट द्या.

● आपण भेट देत असलेल्या कंपनीबद्दल आपल्या जवळच्या लोकांना त्या बद्दल माहिती द्या.
 
● आपले काम काय असेल, हे आधी स्पष्ट करून घ्या.
 
● संबंधित कंपनीबद्दल माहिती जाणून घ्या. 

● नोकरीच्या ऑफरची सत्यता पडताळून घ्या.

● तुमचे बँक खाते किंवा त्यासंबंधीत डिटेल्स कोणलाही मुलाखतीनंतर लगेच देऊ नका.

● नोकरीसाठी पैसे भरावे लागत असतील तर ती नोकरी स्वीकारू नका.

● फसव्या जाहिराती आणि नोकरीच्या येणाऱ्या संधीपासून सावध राहा.

● नेहमी सतर्क राहा. 

अशाप्रकारे आम्ही दिलेली माहिती नक्कीच आपल्याला फायदेशीर ठरेल. बाकी, आणखी विषयांसोबत आम्ही आपल्यासोबत दररोज जोडलेले असतोच. आपल्यालाही काही गोष्टींची माहिती हवी असल्यास ती कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा, आम्ही ती आपल्यापर्यंत जरूर पोहचवू. तसेच आमच्या इतरही सोशल मीडियाशी जोडले जा.
हेही वाचाच...