वंटास मुंबईची टीम म्हणते की माणसाने आयुष्यात संधीसाधू असावं. आता हे काय नवीन? असा पश्न पडला असेल, तर खबर अशी आहे की मुंबईकरांनो, कोरोना विषाणूचा नायनाट झाल्यानंतर आपल्याकडे कामाची खूप मोठी संधी आहे, समजलं नाही ना, तर वाचा पुढे...
राज्यासह मुंबईत बेरोजगारी वाढत आहे, युवा पिढीच्या हाताला काम नाही, कोणतीही नोकरी मिळत नाही त्यातच भर म्हणजे परप्रांतीयांनी बळकावलेल्या नोकऱ्या. संविधानानुसार माणसाला कुठेही वावर करण्याचा, स्थायिक होण्याचा तसेच काम करण्याचा अधिकार आहे. मग त्या परप्रांतीयांच काय चुकलं. मुंबईतला मराठी माणूस आपल्या इज्जतीला फार प्यारा. जर काम मिळत नसेल, नोकऱ्या नसतील तर परिसरात एखादी वडापावची गाडी टाकली तर काय हरकत आहे. कुणाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू केला तर त्याचे समाधान राहील, असं अनेकांना वाटतं पण कोण करत नाही?
आज आपण बघतो, मुंबईत हाताच्या जेमतेम बोटावर मोजण्याइतके लोक असतील, जे स्वतःचा व्यवसाय करत आहेत. त्यांच्या हिंमतीला दाद द्यायला हवी. पण उरलेल्यांचं काय? ते परप्रांतीय येतात, हाताला लागेल तो व्यवसाय करतात आणि आपण म्हणतो, वडापाव खायचा तर त्या भैयाच्या गाडीवरचाच आणि इडली-सांभार खावे, तर त्या आण्णाकडचेच. का नाही आपण हे सगळं सुरू करत?
कोरोनानंतर मुंबईकरांसाठी नोकऱ्यांची लॉटरी
कोरोनाच्या महामारीने सगळ्या व्यवसायांवर पाणी फिरविले. छोटा मोठा व्यवसाय करणारे परप्रांती लॉकडाऊनमुळे त्यांच्या गावी निघून गेले. आता ही मुंबईकरांसाठी किंबहुना प्रत्येक मराठी माणसासाठी सुवर्णसंधी आहे. जो मराठी माणूस नोकरी नाही म्हणून खचून जातो त्या प्रत्येकासाठी.
आता मुंबईच्या प्रत्येक माणसाने कामाला लागावं. घरी बसून वेळ व्यर्थ घालवण्यापेक्षा संधीच सोन करावं. कुठे नोकरीसाठी जागा आहे, कुठे आपण चांगला व्यवसाय करू शकतो, ते पाहावं. मोठं मोठ्या कंपनींना कामासाठी ऑनलाईन अर्ज टाकावेत. ढासाळलेली अर्थव्यवस्था आणि झालेला तोटा भरून काढण्यासाठी नक्कीच कंपण्यांना जास्त कामगारांची आवश्यकता असेल, मग आपण आताच कामाला लागलो तर संधीचा चांगला फायदा घेता येईल.
कोरोना तर लवकर नष्ट होईलच त्यांनतर आर्थिक संकट घेऊन प्रत्येक मुंबकराने वेळीच सतर्क व्हायला हवे. सरकारच्या नावाने बोंबा मारण्यापेक्षा, घरी बसून रोजगार उपलब्ध नाही असे म्हणण्यापेक्षा कामाला लागा. कोणतेही काम छोटे नसते, लाज बाळगून बसला तर बसलाय तिथेच संपाल. जागे व्हा, परप्रांतीय येण्याच्या आधी वडा, समोसा, डोसा, इडली, पोहे, शिरा, उपमा पाणीपुरी बनवण्यापासून होम डिलीव्हरी, कंत्राटदार, सोने दुकानदार, कंपनीचा मालक बनण्याच्या तयारीला लागा.
राजकारणी मंडळींचा घ्या असा फायदा
आतापर्यंत आपण राजकारणी लोकांचा झेंडा हातात घेऊन मिरवत बसलो, आता त्याच राजकारण्यांची मदत घेण्याची ही वेळ आहे. इलेक्शनच्या वेळीस हाथ जोडणाऱ्या मंडळींचा चांगल्या कामासाठी उपयोग केला तर काय वाईट आहे. बेरोजगारीचा मुद्दा असो वा आणखी काही, परप्रांतीयांचा मुद्दा आपण नेहमी उचलून धरला पाहिजे. थोडा गांभीर्याने विचार केला आणि आपण कामाला सुरुवात केली तर परप्रांतीयांना जागाच नही उरणार.
आता ही वेळ राजकारण्यांसमोर हाथ जोडण्याची नाही तर आपल्या माणसाच्या हाताला हाथ धरून हक्क मिळवण्याची आहे. महानगरपालिकेकडून परवानगी मिळवा, आपापल्या कामात भांडवल उपलब्ध करा आणि लागा कामाला.
वंटास मुंबई म्हणते, चालून आलेल्या संधीचा फायदा घ्या आणि व्यवसाय सुरू करा, या कोरोनावर मात आपण एक दिवस करूच, पण समोर येणाऱ्या आर्थिक अडचणींचं काय, बेरोजगारीचं काय? हे प्रश्न आयुष्याचे आहेत, त्यांच्यावर मात तर आतापासूनच करण्यास सुरू केलं पाहिजे. कारण कोणासमोर आलेली अडचण ही कोणाची तरी संधी असते.
हेही वाचाच...


2 Comments
👌👌👍👍👍
ReplyDeleteअगदी बरोबर गोष्टी मांडल्या आहेत. हीच ती वेळ.
ReplyDelete