कोरोना व्हायरसमुळे अनेकांची परिस्थिती काहीशी अगदी सारखीच झाली असल्याचं पाहायाला मिळतेय. अनेकांच्या घरात पैसे येणे बंद झाले आहेत, अनेक लोक दोन वेळेच्या जागी आता फक्त एका वेळेचे जेवन जेवत आहेत.
हे आलेल्या संकटाचं विदारक सत्य म्हणायला हरकत नाही, आम्ही आज अशाच एका कुटुंबाची परिस्थिती आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत, ज्यांनी आयुष्यभर अकेनांचं पोट भरण्याचं काम प्रामाणिकपणे पार पाडलं, आज त्यांच्यावरच उपासमारीची वेळ आली आहे.
मुंबई जितकी जगभरात प्रसिध्द आहे, तितकेच इथले डबेवालेदेखील प्रसिध्द आहेत. मुंबईतल्या डबेवाल्यांचं नियोजन हेचं त्यांच्या कामाची ओळख आहे, मात्र ती ओळख पुसून जाणार नाही ना? असाच भितीदायक सवाल समोर येतोय, कारण आज अनेक मुंबईच्या डबेवाल्यांसमोर जिवंत राहाण्याचा आणि दोन वेळेच्या जेवनाचा प्रश्न निर्माण झालाय. संपुर्ण काम बंद असल्याने त्यांचे पगारही बंद आहेत, मात्र या सगळ्यात त्यांना कोण मदत करण्यास पुढेही सरसावले नाहीत.
महाराष्ट्र प्रशासनाकडून प्रत्येक डबेवाल्यांच्या अकाऊंटमध्ये प्रत्येकी 2000 रुपये ट्रान्सफर करण्याचा निर्णय घेतला आहे, डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी ही माहिती दिली. सुभाष तळेकर म्हणतात संघटनेकडून प्रत्येक डबेवाल्याला एक ते दीड हजारांपर्यंतचे रेशन देण्यात आलं आहे, मात्र हे रेशन किती दिवस टिकेल, हा विचारदेखील करणे गरजेचे असेल.
मुंबईतील डबेवाल्यांपैकी अनेक लोक लॉकडाऊनच्या सुरूवातीलाच आपल्या गावी गेले होते, मात्र आपल्या मुलांच्या परिक्षेमुळे मुंबईतच राहिलेले डबेवाले आता इथेच अडकून पडले आहेत. अशांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.
एका डबेवाला काकांशी आमचं बोलणं झालं, त्यावेळी त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवरून अशी माहिती दिली की आम्ही 2 महिन्यांहून अधीक काळ घरात बसून आहोत, माझे सहकारी मला गावी येण्यास सांगत होते, मात्र मुलांची शाळा असल्याने मला गावी जाता आलं नाही. त्यातच लॉकडाऊन वाढत गेला आणि माझ्याकडचा पैसा संपत गेला. माझ्यावर इतकी वाईट वेळ आली की ज्या मुलाच्या गल्ल्यात मी रोज एक-दोन रुपये टाकत होतो, आज तेच पैसे घेऊन तांदूळ आणि इतर बाजार आणला. हे करताना जरी डोळ्यात पाणी आलं असलं तरी माझ्याकडे कोणताच पर्याय नव्हता.
हा जरी त्रास असला तरी लॉकडाऊन उठल्यानंतर अजून एक मोठी समस्या माझ्या समोर उभी आहे. ती म्हणजे मुलांच्या शाळा आता सुरू होण्याचे संकेत आहेत, आता तर माझ्याकडे कुठलाच पर्याय नाही, की मी माझ्या मुलांना शाळांमध्ये कसं घालू? अशा अनेक समस्या असलेले लोक आज तुमच्या आजूबाजूला आहेत, त्यांना तुम्हाला जसं जमेल तशी मदत करा, हा लेख कसा वाटला, हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आणि अशाच वंटास पोस्टसाठी आमच्या सोशल मिडीयाशी रोज भेट देत राहा.
हा व्हिडीओ तुमच्यासाठीच
हेही वाचाच...


0 Comments