गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लॉकडाऊन असतानाही ती का वाढते याचा अंदाज सगळे वर्तवत आहेत, मात्र मुळ कारण अद्याप कोणाला समजले नाही.
भारतात कोरोनाचे रुग्ण शेकड्याच्या पटीत असताना लॉकडाऊन लावला होता, महाराष्ट्रातही (देशातले सर्वाधिक रुग्ण असलेलं राज्य) त्याचवेळी लॉकडाऊन लावला होता, ज्यावेळेस रुग्णांची संख्या 100 च्या पटीत होती. लॉकडाऊन लावूनदेखील रुग्णांची संख्या का वाढते? ट्रम्प यांच्यासारखाच मोदींचा कुठला निर्णय चुकला, या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा आपण या लेखातून प्रयत्न करणार आहोत.
इकॉनिमक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार ट्रम्प यांनी देशाला काही काळासाठी गृहीत धरलं होतं. कोरोना व्हायरसच्या नवंनवीन केसेस देशात पसरत होत्या, मात्र ट्रम्प यांनी देशाची आर्थिक घडी विस्कटेल म्हणून लोकांच्या आयुष्याशी खेळणे पसंत केले आणि परिणामी तिथल्या रुग्णांसोबतच मृत्यूंची संख्याही झपाट्याने वाढली. ट्रम्प यांनी देशात लॉकडाऊन लावण्यास उशीर केला. अनेक गोष्टींवर निर्बंधही उशीरानेच लागले, त्यातल्या त्यात सध्या सुरू असलेले जॉर्ज फ्लॉईड प्रकरण हाताळण्यासही त्यांना अपयश आले. त्या एका चुकीमुळे संपुर्ण शहर रस्त्यावर आले आणि अचानक आपेक्षेपेक्षा मोठा कोरोनाग्रस्तांचा आकडा पुन्हा वाढला. ही ट्रम्प यांची चुक ठरली.
भारतातही तशाच; पण वेगळ्याप्रकारे काही चुका झाल्या. राज्य आणि केंद्रांच्या चुकीच्या अंदाजांचे बळी कामगार वर्ग आणि सामान्य नागरीक झाले. देशात आणि महाराष्ट्रातही घाई घाईत सगळंच बंद करून टाकलं. त्यानंतर होणाऱ्या परिणामांचा ना केंद्राने विचार केला ना राज्याने. मोदींनी लॉकडाऊन लागण्यासाठी फक्त 4 तासांचा वेळ दिला होता. त्यातच सगळं गणित चुकलं.
डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तीन नामांकित संस्थांनी फोल ठरलेल्या सरकारच्या निर्णयांवर जोरदार टीका केली आहे. या संस्थांचे म्हणणे असे होते की विचारविनिमय न करता आखलेल्या अनेक धोरणांमुळे काही देशवासियांना मोठी किंमत मोजावी लागली आहे. अधिकाऱ्यांच्या मते अतिशय कडक लॉकडाऊन असूनही दोन महिन्यांत देशातल्या रुग्णांची संख्या 606 रुग्णांवरून (3 जून पर्यंत) 2 लाखांच्या खूप जवळ पोहोचली आहे.
नेमकं घोडं अडलं कुठे?
(उदा. तुम्ही घराची साफसफाई करत आहात, तुमच्या कपड्यांपासून भांड्यांपर्यंत सगळं विस्कटलेलं आहे. त्यात तुमच्या घरी न सांगताच पाहूणे आले, तर तुम्हाला आहे तिथेच हातातलं काम सोडून पहिला पाहूणचार करता, पाहूणे गेले की मग सगळ निटनेटकं करता.) देशाची परिस्थिती अशीच काहीशी झाली आहे, सगळे लोक नोकरी, काम, व्यवसायाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी पसरले आहेत, लॉकडाऊनच्या आधी (कोरोनाचे संक्रमण पसरण्या आधीच) त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पाठवणे गरजेचे होते, येणाऱ्या परिस्थिची जाणीव देणं गरजेचं होतं. मात्र सरकारला कोरोनाचा संकेत समजलाच नाही, कोरोना व्हायरसला गृहीत धरून फक्त 21 दिवसात कोरोनावर आपण विजय मिळवू शकतो, हे सांगणे ही सरकारची दुसरी चुकीची गोष्ट ठरली.
इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. संघमित्रा घोष यांनी बीबीसी या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यासाठी आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या पथकाला बोलावले होते, पण नियोजन आणि चर्चा होण्याआधीच सरकारने 'लॉकडाऊन' हा पर्याय निश्चित केला होता. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय ठेवून आधी देशातले टेस्टिंग वाढवणे, मिळेल त्या रुग्णाला दवाखण्यात दाखल करणे हे पर्याय उपलब्ध होते, मात्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले असे घोष म्हणतात.
देशात 22 मेपर्यंत उपासमार, अपघात आणि इतर बर्याच कारणांनी (कोरोनाचे मृत्यू सोडून) 667 हून अधीक मृत्यू झाले असल्याचं आणि याचा आकडा वाढत असल्याचं अन्नधान्य हक्कांसाठी काम करणाऱ्या राईट टू फूड या संस्थेचं म्हणनं आहे. त्यामुळे केंद्र सरकारची तिसरी मोठी चूक की त्यांनी देशातल्या 90 लाखांहून अधीक कामगारांच्या पोटावर अचानक लाथ मारली. त्यांना लॉकडाऊनच्या आधी घरी जाऊ देणं गरजेचं होतं. एकाबाजूला ही परिस्थिती आहेच, मात्र दुसऱ्या बाजूला आजून एक भयान सत्य म्हणजे 'अनलॉक-1'.
कोरोनाची भली मोठी वाढ आता सुरू झालेय (रुग्णांची संख्या आता झपाट्याने वाढू लागलेय) आणि याच्यातच अनलॉक -1 सुरू झालाय, अनेक ट्रेन सुरू झाल्यात, लोकांचं स्थलांतर सुरू झालय, त्यामुळे एके ठिकाणी थांबलेला कोरोना व्हायरस आता गावाखेड्यांमध्ये पसरू लागलाय. त्यामुळे ही केंद्राची / राज्याच्या नियोजनाची मोठी चूक म्हणायला हरकत नाही.
एकिकडे कोरोना आहे, तर दुसरीकडे भूक आहे, या सगळ्यात तुम्ही तुमची काळजी घेऊन कामं करा, इतकंच वंटास मुंबई सांगते. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि अशा वंटास पोस्टसाठी आमच्या सोशल मिडीयाशी कनेक्ट राहा.
|| घरी राहा; सुरक्षित राहा||
हेही वाचाच...


0 Comments