दिनांक 24 मे रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे त्यांच्या सोशल मिडीयावरून लाईव्ह आले. राज्यात असणारी कोरोना संक्रमनाची आणि लॉकडाऊनची परिस्थिती त्यांनी सांगण्यास सुरूवात केली. राज्यातील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनही केलच, पण त्याच बरोबर काही दिवसांपासून विरोधी पक्ष नेत्यांना पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरेदेखील त्यांनी देण्यास सुरूवात केली. 

नेमकं घोडं अडलं कुठं?
गेल्या काही दिवासंपासून म्हणजेच लॉकडाऊनच्या नंतरच्या काळात अनेक सत्ताधारी पक्षांची काहीशी केंद्रासमोर नाराजी होती. अनेक रक्कम केंद्राकडे प्रलंबित आहे, तर केंद्राकडून राज्याला मदत मिळत नाही, असंदेखील अनेक नेत्यांचं म्हणनं होतं. उध्दव ठाकरे आजदेखील म्हणाले की आम्ही केंद्राकडे रोज 80 ट्रेनच्या मागण्या करत आहोत. मात्र केंद्राकडून फक्त 30 ते 40 ट्रेनचा पुरवठा केला जात असल्याने काहीशी गैरसोय होत आहे. तरीही आपण अनेकांना त्यांच्या घरापर्यंत सोडण्याचा होईल तितका प्रयत्न करत आहोत, असे मत उध्दव ठाकरेंनी मांडलं.

टॅग न करता, गोयलांचं नेमकं काय सुरू आहे?
पहिलं ट्विट : 24 मे, संध्याकाळी 7 वा. 14 मिनिटं
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचं लाईव्ह झाल्यानंतर काही तासातच केंद्रिय मंत्री पियूष गोयल यांनी ट्विटरचा भडीमार सुरू केला. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी उध्दव ठाकरेंची विचारपूस केली खरी, मात्र त्यांना अप्रत्यक्षरित्या कामालाही लावलं. केंद्राकडून आज म्हणजेच 25 मे रोजी तब्बल 125 ट्रेन महाराष्ट्रसाठी किंवा तिथे अडकलेल्या कामगारांच्या प्रवासासाठी दिल्या जातील, तुमच्याकडे तयार असलेली कामगारांची यादी, ते कुठून कुठे जाणार आहेत, त्याची माहिती पुढील एक तासात रेल्वेच्या महाप्रबंधककडे पोहोचवा, ज्यामुळे आम्ही ट्रेनचे नियोजन करू. या शब्दात ट्विट केलं.


एक तासांनी पुन्हा ट्विट करत म्हणाले की टिव्हीच्या माध्यमातून समजलं की महाराष्ट्र सरकारने 200 ट्रेनमधून प्रवास करतील इतक्या कामगारांची यादी पाठवली आहे. मात्र रेल्वेच्या जीएमकडे अशाप्रकारची कोणतीच यादी आली नाही, तरी कृपया ही यादी लवकरात लसवकरत पाठवावी.

दीड तासांनी पियुष गोयल यांनी परत ट्विट केलं.

अडीच तासांनी सेंट्रल रेल्वेचं एक जाहीर पत्रकासोबत पियूष गोयल यांनी ट्विट केलं.

पियुष गोयल यांनी केलेलं रात्री 12 वाजताचं ट्विट


रात्री 2.15 चं पियुष गोयल यांचं ट्विट

 या सगळ्यावर शांत बसेल ती शिवसेना कसली? शिवसेनेचे खासदार, धडकची तोफ शिवसेनेचे गेम चेंजर अशी ओळख असलेले सामनाचे संपादक संजय राऊत यांनीदेखील खड्या शब्दात केंद्रिय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना टॅग करून सुनावलं.


कोरोनाच्या आधीपासून सुरू असलेलं हे ट्वटरवरचं महायुध्द कोरोनाच्या काळातही चांगलच गाजत आहे. त्यामुळे भविष्यातली राजकीय गणितं आणि दोन सरकारमधला एकमेकांचा संपर्क हा ट्विटरवरूनच होतो की काय, असा सवालदेखील जेष्ठ अभ्यासकांकडून वर्तवला जात आहे. या सगळ्यावर महाराष्ट्र सरकार काय प्रतिक्रिया देतय, हेच पाहाणे आता गरजेचे ठरेल.

सध्यातरी हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे आम्हाला कमेंटमधून जरूर कळवा. आणखी काही विषय सुचवायचे असतील, तर त्याबद्दलही कळवा आणि अशा वंटास पोस्टसाठी आमच्या सोशल मिडीयाशी नक्की कनेक्ट राहा.