येत्या सोमवारपासून अनेक शहरांमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील लोक गावी जाऊ शकणार आहेत. राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब आणि परवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी तशाप्रकारची नियमावलीदेखील लागू केलेली आहे. यामुळे राज्यात अडकलेल्या नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी परत जाण्यासाठी काही अटींच्या आधारे ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
काय तयारी कराव लागेल?
महाराष्ट्रातील रेड झोन आणि कंटेनमेंट झोनमधील कोणत्याही क्षेत्रातला विद्यार्थी अथवा नागरिक दुसऱ्या ठिकाणी प्रवास करू शकणार नाही. उर्वरित लोक एक यादी तयार करून त्यात तुम्ही आणि तुमच्या सहकाऱ्यांची नावे, आधार क्रमांक, सध्या राहात असलेल्या पत्ता, कुठे जाणार त्या ठिकाणचा पत्ता अशी माहित एकत्र करून तुम्ही राहात असलेल्या जवळच्या पोलीस ठाण्यात जमा करावी. पुढील काही दिवसांमध्ये तुम्हाला तुम्ही दिलेल्या नंबरवर तुम्हाला कुठून आणि कधी बस पकडायची आहे, कुठे सोडण्यात येईल अशी माहिती टेक्स्ट स्वरुपात येईल.
काय असतील नियम :
1. बसमधून साधारणपणे 21 ते 22 लोक प्रवास करू शकतील. त्यामुळे 21 -22 लोकांचा एक ग्रुप तयार करणे बंधणकारक. त्या ग्रुपने आपल्या ग्रुप लिडरच्या नावासह, सर्वांची नावे, संपूर्ण पत्ता, जिथे जायचे आहे तेथील पत्ता, आधार कार्ड नंबर असा फॉर्म भरून शहरी भागात असाल तर पोलीस आयुक्त कार्यालय व ग्रामीण भागात असाल तर जिल्हाधिकारी / तहसीलदारांकडे जमा करावीत.
2. जे नागरिक वैयक्तिक जाऊ इच्छितात त्यांनी एस. टी. महामंडळाने तयार केलेल्या ऑनलाईन पोर्टलद्वारे नाव नोंदणी करायची आहे. हे पोर्टल सोमवारपासून सुरू होईल. यावेळी, आपण सध्या राहात असलेला पत्ता आणि तेथील जिल्हाधिकाऱ्यांच्या किंवा पोलीस आयुक्तालयाच्या परवाणगीची प्रत जोडणे आवश्यक आहे.
3. या प्रवासादरम्यान, प्रवाशांनी मास्क घालणे, सोबत सनिट्झर ठेवणे बंधनकारक आहे. बस निघण्यापूर्वी व पोहचल्यानंतर सॅनिटाईज केली जाईल.
4. ज्या जिल्ह्यांमध्ये हे प्रवासी जाणार आहेत, तिथे त्यांची तपासणी करून संस्थात्मक किंवा घरीच विलगीकरण करण्याचे अधिकार तिथल्या तिल्हाधिकाऱ्यांकडे / नोडल अधिकाऱ्यांकडे असतील.
5. ही पॉईंट टू पॉईंट सेवा आहे. प्रवासात मध्येच कुठे प्रवासी उतरणार नाही किंवा चढणार नाहीत. लांब पल्याच्या गाड्या कुठेही जेवणासाठी थांबणार नाहीयेत, त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांनी आपले जेवन घरूनच घेऊन जावे.
7. ही सुविधा मुंबई, पुणे अथवा इतर ठिकाणातील कंटेनमेंट झोनमधील नागरिकांना उपलब्ध असणार नाही. त्यामुळे त्यांनी हा अर्ज करू नये.
ही सुविधा फक्त लॉकडाऊन संपेपर्यंतच म्हणजे 17 मेपर्यंतच असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर गर्दी न करता सदर फॉर्म भरून तुमचं गावी जाण्याचं निश्चित करा. कृपया पोलीस कार्यालयांमध्ये, जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये, बस स्टॅन्ड किंवा रस्त्यावर गर्दी करू नका.
हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा, या व्यतीरिक्त तुम्हाला अजून कोणती माहिती हवी असेल, तर त्यासंदर्भातील ही कमेंट करा आणि मुंबईच्या अपडेटसाठी वंटास मुंबईला नक्की भेट द्या.
हेही वाचाच...


1 Comments
Very nice
ReplyDelete