कोरोना विषाणुने आपले जाळे संपूर्ण विश्वभर पसरवले आहे आणि या जाळ्यात आपली रिटायर्ड माणसं जास्त अडकलेली दिसतात. हा आजार ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल, त्यांना जाळ्यात अडकवतो, मग निश्चितच जगात तसेच आपल्या भारतात कोरोनामुळे दगावल्यांच्या रुग्णांमध्ये ६० वर्षांहून अधिक वय असलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्याच्यात भर म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयविकारासारखे आजार.

आता ज्यांना हे आजार आहेत, त्यांना कोरोना व्हायरस संसर्गाचा धोका इतरांच्या तुलनेत अधिक असल्याचं आतापर्यंतच्या अभ्यासातून समोर आले आहे. तसेच मृत्यू पावलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येतदेखील आपण जास्त वृद्धांची संख्या पाहिली असेल. आता हे तर आपण रोज बघतोय, पण या सगळ्याला एक आपल्या आजीबाई अपवाद ठरल्या आहेत. 

आमच्या वंटास टीमने त्यांना "सुपर हेल्दी वूमन" असं नाव दिल आहे. तर मग त्या कोण आहेत आणि काय जादू केली त्यांनी कोरोनावर पाहुयात...
कोण आहेत ह्या "सुपर हेल्दी वूमन"
जे अनेकांना जमलं नाही ते चक्क ८१ वर्षांच्या पंजाबमधील चंदीगढला लागून असलेल्या मोहाली शहरातील कुलवंत निर्मल कौर यांनी करून दाखवलं. कोरोनावर मात करत, स्वतः निश्चय केला तर कोरोना काय, आपण सगळं जग जिंकू शकतो, हे त्यांनी दाखवून दिलं. कुलवंत स्वतः पेशाने नर्स होत्या. या कोरोनावर उपचार घेऊन  ठणठणीत झाल्या आहेत आणि आपल्या घरीही परतल्या आहेत.

कशी झाली त्यांना कोरोनाची लागण ?
तेव्हा चंदीगढमध्ये ब्रिटनवरून परत आलेल्या एका २३ वर्षीय तरुणीला सर्वात पहिल्यांदा कोरोनाची लक्षण दिसून आली होती. त्यांनतर तिच्यावर १९ दिवस उपचार केल्यानंतर ती कोरोनातून मुक्त झाली. या मुलीची एक मैत्रीण कुलवंत यांच्या फ्लॅटवर भाडेकरू होती. त्यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना संसर्गामार्फत कोरोनाची लागण झाली. त्यांनतर त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. आताच्या घडीला त्या बऱ्या झाल्या असल्या तरी सध्या आपल्या घरामध्ये क्वारंटाईनमध्ये आहेत.

कशी केली कोरोनावर मात?
स्वतः पेशाने नर्स असल्यामुळे आपण काय खबरदारी घेणे आवश्यक आहे, उपचारादरम्यान काय करावे, स्वतःच्या आरोग्याची देखभाल कशी करायची हे त्यांना चांगलंच ठाऊक होतं. कोरोनाशी लढताना त्यांचं वय ही महत्त्वाची बाब होतीच, पण त्यांना मधुमेह आणि रक्तदाबाचाही त्रास होता. गेल्या ३० वर्षांपासून  मधुमेह आणि रक्तदाबाशीही त्या झुंज देत आहेत. कोरोनाच्या उपचाराबरोबर मधुमेह आणि रक्तदाबाच्या गोळ्या त्यांना घ्याव्या लागत होत्या. त्या नेहमी सकारात्मक विचार करायच्या. हॉस्पिटलमध्ये विरंगुळा म्हणून डॉक्टर त्यांना टीव्ही पाहून देत नसे, कारण त्यावर सतत कोरोना विषयक बातम्या असायच्या. मग त्या हॉस्पिटलमध्ये बसून गुरूबाणीही ऐकायच्या.

उपचार करणारे डॉक्टर देत आहेत कुलवंत ह्यांच्या धैर्याची दाद
कुलवंत यांच्यावर मोहालीमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. त्यांचे डॉक्टर दीपक भसीन सांगतात, “कुलवंत स्वतः एक नर्स होत्या. कुलवंत यांची सकारात्मक वृत्ती उपचारादरम्यान खूप महत्त्वाची ठरली, कारण ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या रुग्णांना अधिक धोका असतो. उपचारादरम्यान त्यांना ताप आला होता. आम्ही त्यांना मलेरियावर दिली जाणारी औषधं दिली. त्यांच्या मधुमेह आणि रक्तदाबाच्या गोळ्या तर सुरूच होत्या. यामुळेही खूप फरक पडला.

काय म्हणतो कुलवंत ह्यांचा मुलगा
कुलवंत ह्यांचा मुलगा गुरमिंदर सिंह यांच्याही कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्या नेगटीव्ही आल्याने त्यांची आईला जास्त खुश झाली. पण त्यांच्या आईला कोरोना झाल्याने ते दुःखी झाले होते. त्यावेळी ते म्हणतात, “आम्ही घरात क्वारंटाईनमध्ये होतो आणि आई हॉस्पिटलमध्ये. एकमेकांना भेटताही येत नव्हतं. मोहालीच्या खासगी रुग्णालयातील डॉक्टर दीपक भसीन आम्हाला सतत त्यांच्या प्रकृतीची माहिती देत होते.”

कोरोना पासून  बऱ्या होऊन घरी आल्यावर त्या सांगतात, 
"परमेश्वराच्या कृपेमुळेच हे शक्य झालं, तसेच आपल्या आईवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही आई बरी झाल्याचे श्रेय त्यांनी दिले."