कोरोना रुग्णांचे ट्रान्समिशन मुख्यतः कोरोना विषाणूंच्या थेंबांद्वारे एकमेकांना होते. हा आजार प्राण्यांद्वारे माणसाला झाल्याचे WHO च्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या आजराची लागण ही हवेमार्फत देखील होते, त्यामुळे कोरोना संक्रमित रुग्ण मग तो जीवित असो वा मृत; इतरांसाठी तो धोकादायक ठरू शकतो, असे अनेक वैध्यकिय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

जगभरातील अनेक रुग्ण कोरोनाशी लढा देतादेता मृत्यूमुखी पडले, देशभरातील संपूर्ण कोरोना मृतांचा आकडा पाहिला तर तो ९० हजारांच्या वर गेलाय. जगात पहिलीवेळ इतकी मोठी जिवीत हानी झाल्याचे इतिहास सांगतो. त्यामुळे इतक्या मृतदेहांना नेमकं कुठं ठेवतात, त्यांचे दफन करतात की त्यांना जाळलं जातं? हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या वंटास वाचकांना पडलाच असेल, त्यामुळे आम्हीदेखील हा विषय घेऊन आता तुमच्यासमोर आलो आहोत. 

कोरोना संक्रमित असलेल्या रुग्णांपासून जर सामान्य नागरिकांना धोका असेल तर त्यामुळे मृत झालेल्या शरिरापासूनही अनेक धोके सामान्य नागरिकांना भेडसावू शकतात, असे अनेक शास्त्रज्ञ म्हणातात. त्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या शरिराला योग्यरित्या डिस्पोज करणे गरजेचे आहे. मात्र ते कसे केले जाते, हे आपण आता पाहू. 

सामान्यरित्या अनेक जाती-धर्मांप्रमाणे प्रत्येकाचे अंत्यसंस्काराचे प्रकार वेगळे असतात. मग हेच जात-धर्म अशा वेळेलादेखील लागू होतात का? नेमकं कशा प्रकारे कोरोनाग्रस्त बॉडीची विल्हेवाट लावली जाते? हे प्रश्न अनेकांना पडत असतील, याचेच उत्तर वंटास टीमने शोधून काढले आहे.

प्रशासन कोरोना डेड बॉडी कुटुंबास अंतसंस्कारांसाठी देते का? 
नाही! प्रशासनाने यावर पूर्णपणे निर्बंध घातले आहेत. कारण रुग्णाचे शरीर स्विकारत असताना कुटुंबातील सदस्यांपर्यंत मृत शरीरातून कोरोना संसर्ग होण्याचा धोका संभावतो. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची बातमी कुटुंबियांना देऊन हॉस्पिटलच्यापरीने शरिराला डिस्पोज केले जाते. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या कुटुंबियांना कोरोना संसर्गाच्या भीतीने अंत्यदर्शनदेखील घेता येत नाही. 

भारतात काय केले जाते कोरोना संक्रमित मृत्य शरिराचे?
भारत देशात अनेक धर्मांची लोक एकत्र राहात असून प्रत्येकाच्या अंतसंस्काराच्या पध्दती वेगळ्या आहेत. पण सरकारच्या आदेशानुसार धर्माचा विचार न करता कोरोना पासून मृत्यू पावलेल्या शरीराला शवविच्छेदन कक्षात ठेवले जाते. कोरोना बाधितांसाठी हे विशेष विच्छेदन कक्ष बनविले गेले आहे. तसेच काही ठिकाणी मृतदेह शीतगृहात अंदाजे 4 डिग्री सेल्सियस तापमानात ठेवले जातात. शवगृहाला  योग्यरित्या निर्जंतुकीकरण करून स्वच्छता केली जाते आणि मग जाळले किंवा दफन केले जाते, अशी माहिती समोर येत आहे.

जगाच्या पाठीवर कोरोना मृतदेहांचे काय केले जाते?
भारताप्रमाणे सर्व देशात कोरोना मृतदेहाचे शव देण्यास परवानगी नाही. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशात कोरोना संक्रमित रुग्णांच्या मृत्यूंचा आकडा 11 हजारांच्या वर जाऊन पोहोचला आहे. अमेरिकेत कोरोना मृतदेहाची विल्हेवाट हॉस्पिटलनजीक असलेल्या शीतगृहात केली जाते. मृतांचे शरीर पूर्णतः पॅक करून शीतगृहात ठेवले जाते.

इटली, न्यूयॉर्क आणि स्पेनसारख्या देशातदेखील मृतदेह शीतगृहात ठेवले जातात. चीन सारख्या देशात, जेथून कोरोना विषाणूचा उगम झाला, तेथे कोरोना संक्रमित रुग्णांचे मृतदेह नागरीवस्तीपासून दूर असलेल्या एका ठिकाणी पॅक करून दफन केल्याचे काही व्हिडीओ मध्यंतरी व्हायरल झाले होते. 

काय म्हणते जगातील आरोग्य संघटना?
कोरोना हा विषाणू भयंकर आहे, कारण त्यावर अद्यापही ठोस औषध मिळालेले नाही. मृतदेह जाळणे अथवा दफन करण्यामध्ये काहीही धोका नाही, परंतु ते योग्यरित्या वरिष्ठांच्या देखरेखीखाली झाले पाहिजे आणि त्याला निर्जंतूकीकरण करणे गरजेचे आहे.