वर्ल्डवाईल्ड तंत्रज्ञानाचा पकडून हाथ, 21 व्या शतकाला विज्ञानाची मिळाली साथ. 

21 व्या शतकातील पिढी म्हणजे, डिजिटल पद्धतीने कामे. 
'आम्ही मुंबईचे' एवढं म्हंटल तरी त्यात खूप वजन येते. बाहेरचे लोक मुंबईतल्या लोकांना सर्वगुण संपन्न आणि पूर्णतः फॉरवर्ड विचारांची ह्या दृष्टीने जास्त ओळखतात. नो डाउट, मुंबई तारीफ के काबिल है! मुंबईत युवा पिढी असो वा आपली एल्डर मंडळी, सगळे आता नवीन विचार पद्धती आचरणात आणायला तत्पर असतात.

21व्या शतकाने मुंबईत अनेक बदल केले. नुसती मुबंई स्वप्ननगरी बनवली आणि सगळ्या संकटाला सामोरे जात मुंबई खंबीर उभी राहिली, पण ह्याच शतकात, आपल्या मुंबईत धोक्याची पहिली घंटा वाजली हे तुमच्या लक्षात येतंय का?

आमचे 21 वे शकत
माणसाचा काळ जसजसा बदलत गेला, तसा मुंबईचा माणूस आणि माणसाची जीवनपद्धतीही बदलत गेली. जादूटोणा, अफवा, जात-पात, धर्म आणि अनेक वैचारिक विषमता काळानुसार बदलत गेली. जगाच्या पाठीवर आपला देशसुद्धा वैज्ञानिक दृष्टीकोनातून चालू लागला. त्यामुळे कानाकोपऱ्यात असणारा भारत देश फॉरवर्ड बनून जगाच्या नामांकित शहरांमध्ये गुणला जाऊ लागला.

लोक परदेशी वस्त्र, भाषा, विचार, त्यांच्या स्टाईल ट्रेंडिंग समजून स्वतः वापर करू लागेल. जग इंटरनेटच्या माद्यमातून जोडले गेल्यामुळे आपल्या लोकांनी भारताची संस्कृती, बोलीभाषा, आपल्या परंपरा, जगासमोर मांडण्यास सुरूवात केल्या. काही त्यांच्यादेखील आचरणात आणल्या. 

चांगल्या गोष्टींबद्दल बोलायचं तर, जात-पात, प्रथा ज्या मानवी जीवाला दुःख देऊ शकतात, अशा अनेक गोष्टी नष्ट केल्या. सर्वांना समान हक्क दिले गेले. लोकांच्या पुरातन काळातील विचारांपासून सुटका करायला वर्ल्ड वाईड इंटरनेटने खूप मदत केली. समाजापासून वेगळं समजणाऱ्या तृतीयपंथींना समाजात मानाचे स्थान प्राप्त करून दिले. 21 व्या शतकात, हा बदल घडून आल्यानंतर भारत हा पहिला देश जिथे तृतीयपंथीचे लग्न झाले. तसेच समलिंगी असणाऱ्यांना वावरण्याची वा लग्न करण्याची अधिकृत परवानगी दिली गेली. पण हे सगळ्याच ठिकाणी नाही. अर्थातच लोकांना नवीन गोष्टी स्वीकारायला वेळ लागतो, पण मुंबईचे वातावरणच डिजिटल, इथला प्रत्येकजण सगळ्या गोष्टी पटकन स्विकारतो.

मुंबईला जळणाऱ्यांसोबत जुळणाऱ्यांचीही साथ भेटत गेली आणि मुंबई वाढत गेली. सगळेजण मुंबईकर होण्याची स्वप्न पाहू लागली आणि स्वप्न पूर्ती करण्यासाठी आले मुंबईत. आकर्षित करणारी गोष्ट आपली असावी ही भावना स्वाभाविक आहे. पण ही भावना आता मुंबईसाठीच धोक्याची घंटा वाजवत आहे.

21 व्या शतकामुळे मुंबईत पहिली धोक्याची घंटा
माणसाने जेव्हढे मुंबईचे शहरीकरण वाढविले तेवढे मुंबईचे आयुर्मान कमीसुद्धा केले. आर्थिक गोष्टींच्या नादात शहरीकरण वाढविले आणि निसर्गावर मात केली. आज कोरोनाचे संकट पूर्ण जगासमोर आहे. आपली मुबंई सगळ्याच गोष्टीत अव्वल, मग त्या कोरोना ग्रस्तांच्या आकडेवारीतही असलीच पाहिजे. कारण जितकी माणसे या मुंबईत आहेत तितकी तर जागासुद्धा नाही.

गरजेपेक्षा जास्त खाल्ल्यावर शरीरावर त्याचे वाईट परिणाम होतात. ही तर मानवनिर्मित मुबंई आहे. शहरीकरण आणि आर्थिक सुखासाठी माणसाने मुंबईला संकटाच्या खड्ड्यात स्वतः टाकले. जागा मिळेल तिथे बिल्डींग उभारत गेला. भाव वाढत गेले. फक्त नोकरीच्या पगारावर लोकांच्या गरजा भागत नव्हत्या तर त्यामुळे भ्रष्टाचार वाढला. श्रीमंत अधिक श्रीमंत होत गेला आणि आपला गरीब तोच गरीब.

जर शहरीकरण ज्या जागी गरज आहे तिथे केले असते तर?
म्हणजे की आपली धारावीतील झोपडपट्टी. पुनर्वसन करून एखादी गोष्ट नवीन अशी नाही म्हणता येत. वेळ होती तेव्हा "प्रॉब्लेम को जड से निकालनेकीं जरूरत थी". पण तेव्हा काही अस झालं नाही. मग मोठ्या संकटात ही छोटी दिसणारी समस्या मोठी होणारच. नको तिथे इमारत, मोठं मोठे प्रोजेक्ट उभे केले जात आहे. निरसर्गावर जगणारे पक्षी, प्राणी कोणाच्या आशेवर जगणार? आज मेट्रोसारख्या प्रकल्पांसाठी आरे जंगलतोड केली गेली. सरकार म्हणे, नागरिकांच्या सोईसाठी, पण हेच नागरिक लाखोंच्या संख्येने याचा विरोध करत होते. तरीही केलाच नाश त्या जंगलाचा. मग तक्रार केली जाते. अहो, प्राणांचे राहते घर तुम्ही उध्वस्त कराल, त्यांना रहायला, मोकळा श्वास घायला जागा नसेल, तर ते तुमच्या घरी येणारच.

शहराची क्षमता किती आणि लोक राहतात किती?
साहजिकच गरजू वस्तूंचा तुटवडा पडणारच. कोरोनासारखे संकट आतापर्यंत नाहीसे झाले असते जर पुरती लोकसंख्या आणि जागा असती तर. शहरीकरण कमी आणि निसर्गाला जास्त महत्व दिले गेले असते तर. आज कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आपण सगळे घरी आहोत, तर पक्षी-प्राणी मुक्त संचार करताना दिसतात. कधी न चिव चिवनारा पक्षांचा आवाज आज ऐकायला येतो. दूषित झालेली हवा आज माणूस घरी बसल्यामुळे आटोक्यात येत आहे. प्रदूषण कमी झाले आहे. अजून काय पुरावा हवा, माणसाने मुंबईचे  तीन तेरा वाजविल्याचा?

पाणी डोक्याच्यावर गेल्यावर पूर तर येणारच. जागे व्हा, समजून घ्या. कोरोना ही 21 व्या शतकातील पहिली धोक्याची घंटा आहे. आपण शहरीकरण थांबविले नाही आणि असच जर निसर्गासोबत खेळत राहिलो, तर सगळी मुंबई उध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. कोरोना तर आपल्याला चेतावणी द्यायला आला आहे. अजून पुढे काय होईल याचा नेम नाही. वेळ आहे जागे व्हा, वाचवा मुंबई आणि जनजीवन...

हेही वाचा...