डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला कोरणाचे संकट जगावर उद्भवले, सुरवात ही चिनधील व्यूहान या शहरातून झाली. 12 मार्च 2020 रोजी दुबईहुन एक तरुण भारतात परतला तो केरळ राज्यातील होता. विमानताळावर त्याची लक्षण दिसून आली त्यामुळे त्याची चेकिंग करण्यासाठी त्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, काही दिवसांनी जेव्हा त्याचे रिपोर्ट आले ते रिपोर्ट कोरोना पोजिटिव्ह होते, तेव्हा तो तरुण घरी कोरोनटाईन होता. नंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हा त्याची टेस्ट निगेटिव्ह आली. या रुग्णाची सर्व काळजी ही तेथील ग्रामपंचायतीने घेतली होती. भारतातील कोरोनाचा पहिला रुग्ण हा केरळमध्ये आढळून आला होता. परकीय देशातील शक्तिशाली विषाणू या पध्दतीने हळू हळू भारतात पोहोचला.
एक वेळ केरळमध्ये अशी होती की महाराष्ट्रापेक्षा अधिक रुग्ण हे केरळमध्ये होते; पण आताचे चित्र उलटं आहे, त्यामुळे केरळने विषाणू रोखण्यासाठी असं काय केलं की तिथले रुग्ण कमी होऊ लागले. सोबतच भिलवाडा, आग्रा येथील प्रशासनाने नक्की असं काय केलं, की तेथील कोरोनाचा वेग कमी झाला?
केरळ पॅटर्न?
भारतात कोरोना संक्रमनाची सुरुवात केरळमधून झाली. मात्र आता केरळमधील रुग्णांचा आकडा हा स्थिर होऊन 300-400 मध्येच थांबलेला आहे. परंतु यापेक्षा कैकपटीने महाराष्ट्र पुढे धावत आहे. केरळ राज्यातील सरकारने सार्वजनिक आरोग्याला नेहमी महत्त्व दिले आहे. केरळमध्ये याअगोदर H1N1, नीपा आणि महापूर अशी अनेक संकट येऊन गेली आहेत. या संकटांचा सामना करण्यासाठी सज्ज करण्यात आलेली आरोग्यसेवा हे कोरोनविरोधात लढण्याचे शस्त्र ठरलेले आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला आरोग्य टीम गावागावात जाऊन कोरोनाबद्दल जाऊन जनजागृती करत होते. केरळमध्ये जेव्हा पुराणे थैमान घातलं होत त्यानंतर आरोग्य सेवकांनी गावोगावी जाऊन जनजागृती केली होती. त्याच दरम्यान शहरात USHA अर्बन सोशल हेल्थ ऍक्टिव्हिस्ट आणि गावात ASHA अक्रिडेटेड सोशल हेल्थ ऍक्टिव्हिस्ट यांचं जाळं संपूर्ण राज्यभर पसरल होतं. जर राज्यात कोणतंही आव्हान आलं तर या संघटनेतील कामगारांना तीन दिवसात तज्ज्ञांकडून प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर त्यांना गावोगावी पाठवून त्याचा प्रसार करण्यास सांगितला जातो. यात एका ASHA वर्करकडे 1 हजार लोकांची जबाबदारी दिली जाते. यासर्वांचा फायदा या केरळ केरळवासीयांना कोरोनाच्या महामारीत झाला आणि त्यांनी उपाययोजना करण्यास सुरूवात केली.
भिलवाडा पॅटर्न
भिलवाडा हे राजस्थानमध्ये आहे. भिलवाड्यात 27 मार्चला 21 रुग्ण होते. याच पाश्र्वभूमीवर भिलवाडा प्रशासनाने उचललेल्या पावलांमुळे रुग्णांची संख्या नियंत्रणात आली. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तेथील प्रशासनाने जीवनावश्यक सेवा वगळता संपूर्ण शहर बंद केले. देशात लॉकडाऊन होण्याअगोदर भिलवाडा बंद झालं होतं. कोणीही घराबाहेर पडायचं नाही अशी सक्त ताकीद देण्यात आली. आरोग्य विभागाने शहरी भागासाठी 332 मेडिकल टीम तयार करून घरोघरी जाऊन 20 लाखांपेक्षा अधिक लोकांचे चेकिंग चालू केले. येथील लोकसंख्या 30 लाख आहे. भिलवाड्यातील बांगड हॉस्पिटलमध्ये जेव्हा रुग्ण होते तेव्हा हा परिसर पूर्ण सील करण्यात आला. भिलवाड्याचे कलेक्टर राजेंद्र भट यांच्या ऑफिसमध्ये एक वॉररूम आणि कन्ट्रोल रूम तयार करण्यात आली आहे, येथून संपूर्ण जिल्ह्यातील हालचालीवर लक्ष ठेवले जाते, यामुळेच हा जिल्हा देशाआगोदर कोरोनातून मुक्त झाला.
आग्रा पॅटर्न
उत्तर प्रदेश येथील आग्रा येथे जयपूरहुन एक ग्रुप आला होता, यामधील एक तरुण कोरोना पॉजिटीव्ह होता. जिल्हा प्रशासनाने तो ग्रुप ज्या-ज्या ठिकाणी गेला होता आणि ज्यांच्या संपर्कात आला होता त्यांच्यावर लक्ष ठेवले आणि ताबडतोब उपचार केले. बाहेरून आलेल्यांना देखील कॉरंटाईन केले होते. केंद्र सरकारने दिलेल्या नवीन सूचनांनुसार आग्र्याचा प्लॅन तयार होता.
पाहा काय होता प्लॅन?
जिकडे पॉजिटीव्ह रुग्ण आढळले तिथली गल्ली, परिसर हॉटस्पॉट घोषित करून सील करण्यात आले. तस एकाच ठिकाणीपाच हून अधीक रुग्ण आढळले तर तेथील तीन किलोमीटर परिसराला हा कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलं. तेथील गोष्टींवर लक्ष ठेवले गेले. यातही वाढ झाली तर मग त्या परिसराला बफर झोन म्हणून घोषित केलं जातं. त्याच्या आधारावर संसर्ग रोखला जावा यासाठी कडक कार्यवाही सुरू केली जाते. सध्या आग्र्यामध्ये 38 कंटेंमेंट झोन असून 137 कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण असल्याची माहित आहे.
ज्याप्रमाणे आग्र्यामध्ये कंटेंमेंट प्लॅन राबवण्यात आलाय असाच प्लॅन मुंबईत योग्यरित्या राबवला जातोय आणि याचा योग्य फायदा होत आहे, असं आरोग्य सचिव लव अगरवाल यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातील जास्त रुग्ण हे मुंबईत आहेत जर केरळ, भिलवाडा आणि आग्रा पॅटर्न सुरुवातीपासूनच मुंबईत वापरला असता तर मुंबईचे चित्र आज काही वेगळे दिसले असते.प्रत्येकाला संकट येत असते, यामधून आपण काहीतरी शिकवण घेतली पाहीजे, ज्याप्रमाणे केरळने महापुरापासून शिकवण घेऊन कोरोनाचा प्रसार रोखला, अशीच शिकवण मुंबईच्या पालिकेसह महाराष्ट्र राज्य सरकारने घेतली पाहीजे. याचा फायदा येणाऱ्या पीढीस नक्कीच होऊ शकतो आणि येणाऱ्या परिस्थितीस दोन हात करण्याचे बळ निर्माण होईल.

0 Comments