मस्करकीचा विषय की खरच माहित नाही, पण अनेकांना असं वाटतं की राज्यातील दारुची दुकानं उघडावीत. त्यातच 20 तारखेंपासून राज्यातल्या किंवा देशातल्या काही नियम व अटी शिथील केल्यानंतर अनेकांना वाटलं होतं की खरच दारूची दुकानं उघडतील, मात्र तसं झालेलं कुठे पाहायला मिळत नाही. एका पत्रकाराने 21 तारखेरोजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना हा प्रश्न विचारला होता, की मुंबई तसेच महाराष्ट्रातील दारूची दुकाने उघडण्याच्या मागणीत वाढ होत आहे, यावर प्रशासन काही निर्यण घेणार आहे का?

यावर राजेश टोपे म्हणाले...
राज्यातल्या ग्रिन झोन असलेल्या अनेक ठिकाणी आपण जिवनावश्यक गोष्टी सुरू ठेवण्याचा निर्णय घेत आहोत. त्यामध्ये राशन, भाजीपाला, दुध, किराणा मालाची दुकाने अशांचा यात समावेश असणार आहे. दारुंची दुकाने, बिअर बार किंवा तस्यम दुकांनांचा तसा कोणताच विचार केलेला नाही. मात्र सोशल डिस्टंसिंग एकदम व्यवस्थितरित्या पाळलं जात असेल तर दारुची दुकानेदेखील सुरू करण्यास काहीच हरकत नाही.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मत काय?
राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारला एक परिपत्रक पाठवलं आहे, त्यावर ते म्हणतात की किमान वाईनशॉप सुरू करून राज्याला महसुलाचा ओघ सुरू होतोय का हे बघायला काय हरकत आहे, वाईन शॉप सुरू करा, याचा अर्थ दारु पिणाऱ्यांचा विचार करा असा नाही, तर राज्याच्या घटत्या महसुलाचा विचार करा, हा आहे. हा विषय निव्वळ महसुलाचा आहे, कारण तो महसुल पुर्णपणे आटला आहे. राज ठाकरे यांच्या या मुद्दानंतर जे छुपे आणि दबक्या आवाजात दारु सुरू करण्याची विनंती शासनाकडे करत होते, ते आता मोकळ्या आणि खुल्या मनाने दारू सुरू करण्यासाठी विनंती करू लागले.

महसुल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणतात...
राज्याच्या तिजोरीत पैसा येण्यासाठी आता प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे. तो पैसा कोणत्या मार्गाने येणार हेही पाहणे तितकेच गरजेचे आहे. लॉकडाऊनमुळे दारू विक्री बंद झाली, हे बोलणे चुकीचे ठरेल कारण अनेक ठिकाणी गावठी दारू विकणे, काळा बाजार करणे, दारू चोरून विकणे असे प्रकार सुरूच आहेत, त्यामुळे महसुलाचा विचार करुन, सोशल डिस्टंसिंग पाळण्याच्या नियमांवरून दारू विक्री सुरू करण्याचा विचार केल्यास काहीच हरकत नाही.

मुंबईकरांचं म्हणणं काय आहे?
ज्यावेळी वंटास टीमने काही नागरिकांशी बोलायचा प्रयत्न केला, त्यावेळेस तीन विचारांची माणसं आम्हाला भेटली. त्यात होती, दारू कधीच न पिणारे, लॉकडाऊनमुळे दारू सुटलेले आणि दारू पिणारे.

कधीच दारू न पिणाऱ्यांचे म्हणणं आहे की लॉकडाऊनच्या काळात दारू बंद असल्याने अनेक लोकांची दारू सुटण्यास मदत होत आहे. दारूमुळे अनेक लोकांच्या घरात, तसेच रस्त्यावर होणारी भांडणंदेखील कमी झाली आहेत, काही दिवस असं चाललं तर लोकांची दारू सुटून जाईल, अनेकांना चांगल्या सवई लागतील. या लॉकडाऊनमध्ये जर पुन्हा दारू विक्री सुरू केली, तर लोक दारू पिऊन रस्त्यावर उतरतील, अनेक विचित्र प्रकार घडतील, अजूनपर्यंत जे कधीच घडलं नाही ते आता होईल, कारण आता लोकांच्या दारू पिण्याचं कारण वेगळं असेल. अनेक लोकांचे काम गेल्याने मोठे काहीजण तणावात आहेत. लोकांकडे पैसा नाही, त्यातच दारूची सवय असणारे काहीही करतील, कदाचित घरातील साहित्य विकुण टाकतील.

लॉकडाऊनच्या काळात दारु सुटणारे लोक म्हणतात...
लॉकडाऊनमुळे आम्ही व्यसनातून बाहेर आलोय. त्यामुळे माझ्यासोबत घरचेही खुष आहेत. नशा सुटल्याने घरातील आणि आयुष्यातील वास्तविक चित्र दिसु लागलय. मी दारूवर खर्च होणारा पैसा आता साठवू लागलोय. तोच पैसा घरात येतोय. मी अट्टल बेवडा नव्हतो, पण माझे घरचे सांगतात की मी दारू पिऊन आल्यानंतर मी माझाच नसतो. त्यावेळेस मी कसा वागतो, काय करतो, जेवतो की नाही हे माझंच मला समजत नसायचं. आता छान सुरूय, पण लॉकडाऊन संपावासा वाटतोय, कारण घरातले पैसे संपत चालले आहेत. कदाचित आधीच्या दारूवर रोज दोनशे रुपये खर्च होणारे जर साठवून ठेवले असते, तर आज माझ्या घऱच्यांना डाळभात खाण्याची वेळ आली नसती.

अजूनही दारूची सवय असणारे लोक म्हणतात...
आम्ही दारू पितो किंवा आमची दारू सुटत नाही, याचा अर्थ असा नाही की आम्ही अट्टल दारुडे आहोत. पण ती एक सवय लागली आहे, जशी रोज जेवणाची असते तशी. माझ्या घरच्यांनाही हे माहित आहे, कारण मी दारू जरी पित असलो, तरी घरच्यांना त्रास न देता शांत असतो. आम्ही रोज मुंबईच्या धावपळीत धावत असतो, खूप लोकांशी वादविवाद, बॉसचे टोमणे, काम पुर्ण न झाल्यास येणारा ताण, घरचं टेन्शन, एलआयसीचे हप्ते सुरू असतात, त्यात एक घरदेखील घेतलं आहे, त्याचे हप्ते सुरू आहेत, या सगळ्यात एक तणाव निर्माण झालेला असतो, त्यामुळे दारूची गरज भासते.

दारूमुळे कोरोना कसा पसरू शकतो?
मुंबईत कोणतीच दुकानं उघडी नसताना अनेक ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला असतो, त्यात दारूची दुकाने सुरू करणे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना असेल. कारण इथे प्रश्न दारुंच्या दुकांनाचा नाही की नाही महसुलाचा; प्रश्न आहे सोशल डिस्टंसिंग आणि पसरत चालेल्या कोरोनाचा. मुंबईतल्या अनेक मैदांनांमध्ये दारु पिण्यासाठी लोक एकत्र बसलेले असतात. बारच्या समोर मोठी गर्दी लागू शकते, अनेक घरात दाबून बसलेले लोक बाहेर पडू शकतात. लॉकडाऊनच्या आधी धावत्या मुंबईची आणि दारू पिणाऱ्यांची एक साखळी होती, आता ही सगळी साखळी एकत्र आली आहे, त्यामुळे हातात असलेला कोरोना हाताबाहेर जाण्याची वेळ येण्यास वेळ लागणार नाही.

हा लेख तुम्हाला कसा वाटला, ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आम्हाला आमच्या सोशल मिडीयावर फॉलो करायला विसरू नका. तुम्हाला नव्या कोणत्या विषयाची माहिती हवी असल्यास तेही आम्हाला कमेंटमध्ये कळवा, आम्ही नक्की ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू.

आणखी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...