अलीकडेच देशाच्या 47 व्या सरन्यायाधीश पदी नागपूरच्या शरद बोबडे यांची नियुक्ती झाली होती. त्याचप्रमाणे नागपूरचेच न्या. भूषण प्रद्युमन धर्माधिकारी यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी विराजमान झाले आहेत.
20 मार्च 2020 पासून न्या. भूषण प्रद्युम्न धर्माधिकारी यांची उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारांतर्गत राष्ट्रपतींनी धर्माधिकारी यांना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त केले आहे. बुधवारी या विषयावरील अधिसूचना जारी करण्यात आली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवार दिनांक 18 मार्च रोजी यांच्या नावावर शिक्का मोर्तब केला होता.
न्यायमूर्ती भूषण प्रदयुम्न धर्माधिकारी यांना आज मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईत राजभवनात शपथ दिली.
कोण आहेत न्यायमूर्ती प्रद्युम्न धर्माधिकारी
- न्यायमूर्ती भूषण प्रद्मुम्न धर्माधिकारी यांचा जन्म २८ एप्रिल १९५८ रोजी नागपुरात झाला.
- त्यांनी नागपूर विद्यापीठातून १९७७ साली बी. एस्सी. (जीवशास्त्र), बी. ए. (इंग्रजी साहित्य) या पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
- त्यांनी १९८० साली एलएलबीची पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर त्यांनी सनद प्राप्त केली.
- न्यायाधीश बी.पी. धर्माधिकारी यांचे वडील प्रद्युम्न धर्माधिकारी हेही वकिल पेशाचे आहेत. तर न्या. एस. सी. धर्माधिकारी यांचे ते चुलत बंधू आहेत.
- न्यायमूर्ती धर्माधिकारी यांची गेल्या महिन्यात उच्च न्यायालयाचे कार्यवाहक न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
- न्यायमूर्ती धर्माधिकारी १९८० पासून न्यायालयीन व्यवस्थेमध्ये कार्यरत असून मार्च २००४ मध्ये पहिल्यांदा त्यांची उच्च न्यायालयातले न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती.
- सुरुवातीच्या काळात जबलपूर येथे ऍड. वाय. एस. धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनात धर्माधिकारी यांनी वकिलीचे धडे गिरविले.
- १९८४ मध्ये नागपुरात परतल्यावर अॅड. एच. एस. घारे यांच्यासोबत त्यांनी वकिली केली.
- घारे यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्यानंतर न्यायमूर्ती धर्माधिकारी यांनी स्वतंत्र वकिली सुरू केली. यादरम्यान अनेक सरकारी संस्था, उद्योग, संघटना आणि खासगी पक्षकारांसाठी त्यांनी कामगार न्यायालय, औद्योगिक न्यायालय, दिवाणी व फौजदारी न्यायालये, उच्च न्यायालय, प्रशासकीय न्यायाधिकरणामध्ये बाजू मांडली आहे.
- हायकोर्ट बार असोसिएशनच्या निवडणुकीत विजयी होत त्यांनी तीन वर्षे ग्रंथपाल म्हणून आणि सलग तीन वर्षे कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली. १९९७ पासून त्यांनी न्यायिक अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
- प्रथम मार्च २००४ रोजी अतिरिक्त न्यायाधीश म्हणून आणि मार्च २००६ रोजी न्यायाधीश म्हणून त्यांची पदोन्नती झाली होती.



0 Comments