कोरोनाच्या भीतीमुळे अनेक डोनरने आपलं रक्त दान करण्याकडे पाठ फिरवली आहे, त्यामुळे मुंबईतल्या सर्रास ब्लड बँकांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे.

मुंबई कधी कुणाला ऐकत नसते, मग ते कशाच्याही बाबतीत असो, पण आता एकदम लफडं झालय. ते म्हणजे कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याचाच फटका मुंबईच्या अनेक ब्लड बँकांवर पडल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबईत परदेशातून आलेल्या अनेक परदेशी नागरिकांमुळे कोरोनाचा प्रसार सुरू झाला आहे. त्यामुळेच इथले अनेक नागरिक धास्तावले आहेत. रक्ताचा आणि कोरोना व्हायरसचा तसा काडीचाही संबंध नाही, मात्र कोरोना सोडून अनेक हजारो रुग्ण याच मुंबईत उपचार घेत आहेत, त्यांचं काय? अनेक आजार अगोदरपासून या ठान मांडून बसले आहेत, त्याच काय? यांनातर रक्त लागणारच ना? पण आता कसं झालय तुम्हाला सांगतो ऐका...

वंटास टीम मुंबईच्या एका ब्लड बँकमध्ये गेली होती. तिथल्या अधिकाऱ्यांशी त्यांनी बातचीत केली, त्यावर समजलं, की नेमकी गडबड कुठेय. 

सायन ब्लड बँक येथे असलेल्या निकिता सोनवणे, ब्लड बँक सेक्रेटरी यांच्याशी आमचं बोलणं झालं, त्यावेळी त्यांनी एक गोष्ट क्लिअर केली. ती म्हणजे कोरोना रुग्णांना रक्ताची काहीही गरज नसते. मात्र इतर आजारावर जे रुग्ण उपचार घेत आहेत, त्यांना रक्ताची गरज आहे. त्यासाठी मोठ्याप्रमाणात मागणी होत आहे, मात्र आमच्याकडे त्यांना पुरवठा करण्यासाठी रक्तचा तुटवडा जाणवत आहे. 

कोरोना व्हायरसमुळे आणि त्याच्या अफवांमुळे अनेक लोक रक्त दान करण्यासाठी येत नाही. आमच्याकडे तीन महिन्यांनी, सहा महिन्यांनी येणारे डोनारदेखील घाबरले आहेत. मात्र त्यातील काही जणांना समजवण्यात आम्हाला यश आल आहे आणि ते डोनेट करायलाही तयार आहेत, अस निकिता म्हणाल्या.

निकिता यांनी अजून एक महत्वाची गोष्ट आम्हाला सांगितली, ती म्हणजे कोरोना हा रोग ब्लड ट्रान्समिशन डिसीज नाही. तरी देखील अनेक नागरिकांना रक्तावाटे कोरोना ट्रान्समिट होण्याची भिती आहे. त्यातच व्हायरल होणाऱ्या अनेक गोष्टींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एकीकडे मुंबईच्या अनेक रुग्णालयातून रक्ताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, तर दुसरीकडे अनेक ब्लड बँकांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे, त्यामुळे अनेक बँकांसमोर रक्तपुरवठा करण्याचा प्रश्न उभा राहिला आहे, असंही त्या म्हणाल्या.

व्हायरल होणाऱ्या अनेक गोष्टींवर लक्ष देण्यापेक्षा स्वतः रुग्णालयात जाऊन अनेक गोष्टींची तपासणी करा आणि मगच ब्लड डोनेट करा असे आवाहन अनेक ब्लड बँकांकडून केले जात आहे. त्यामुळे अनेकांचे जीवन वाचवण्यासाठी तुमच्यासारख्या वंटास रक्तदात्याची गरज आहे, हे नक्की