kala Ghoda fest

प्रत्येक वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात अनेक कलाप्रेमींसाठी मुंबईत एक फेस्टिवल आयोजित केले जाते, ज्याचं नाव आहे काळा घोडा फेस्टिवल. काळा घोडा फेस्टिवल हे 1999 सालापासून सुरू झाले. या फेस्टिवलचे "काळा घोडा असोशिएन" नावाचे एक असोशिएनदेखील आहे. हा फेस्टिवल दरवर्षीच्या दर फेब्रुवारी महिन्यातल्या पहिल्या शनिवारी सुरू होतो. वर्षाचे अनेक दिवस फक्त काळा घोडा चौक म्हणून प्रसिध्द असलेल्या भागात फेब्रुवारी महिन्यात भारी बझार भरलेला असतो.

असा सुरू झाला काळा घोडा फेस्ट...
इंग्रजांच्या काळात दक्षिण मुंबईतल्या एका चौकात काळ्या घोड्यावर बसलेला एक पुतळा बांधण्यात आला होता. तो पुतळा इंग्लडचा राजकुमार सातवा एडवर्ड याचा होता. तर आपल्या काळात अल्बर्ट अब्दुल्ला डेव्हिड ससून याने हा पुतळा उभा केला होता. काही कालावधीनंतर घोड्यावरील पुतळा काढण्यात आला आणि फक्त घोडा ठेवण्यात आला, तेव्हापासून या चौकाचं नाव काळा घोडा चौक असं ठेवण्यात आलं. हलवण्यात आलेला हा पुतळा 1965 पासून जिजामाता उद्यानामध्ये ठेवण्यात आला आहे.